शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Satara: अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, कऱ्हाड तालुका हादरला; एकास अटक

By संजय पाटील | Updated: August 27, 2024 13:09 IST

औषध देऊन मुलीचा केला गर्भपात

कऱ्हाड : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. तर गुन्हा दाखल असलेला दुसरा संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने एका आरोपीला अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराबाबतची फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात राहते. संबंधित मुलीवर एका अल्पवयीन मुलासह अन्य एका युवकाने वारंवार अत्याचार केला. मुलीच्या घरी जाऊन त्यांनी हे कृत्य केले. वारंवार झालेल्या अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर एका संशयीताने तिला औषध देऊन तिचा गर्भपात केला.याप्रकरणी मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीने कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अल्पवयीन मुलासह विनोद काटकर नामक युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी विनोद काटकर याला पहाटेच पोलिसांनी अटक केले आहे.देशभरात अत्याचाराच्या घटना वाढत असताना कराड तालुक्यात एका मुलीवर दोघांनी अत्याचार केल्यामुळे तालुका हादरला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भिलारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस