शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मास्कधारी हल्लेखोराचा व्यापाऱ्यावर खुनी हल्ला, कारण अस्पष्ट

By दत्ता यादव | Updated: February 26, 2024 15:37 IST

भिंतीवरून उडी मारून कोयत्याने वार

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका तरुण व्यापाऱ्यावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला असनू, यामध्ये संबंधित व्यापारी बालंबाल बचावले आहेत. ही धक्कादायक घटना दि. २४ रोजी रात्री साठेआठ वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश शिवाजी सोनवणे (वय ३०, रा. ओम श्रीगणेश हाउसिंग सोसायटी, नवीन एमआयडीसी, सातारा) हे व्यापारी आहेत. शनिवार, दि. २४ रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या घरासमोर ते मित्रासोबत बोलत उभे राहिले होते. त्यावेळी एक व्यक्ती पाठीमागून संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये आला. त्या व्यक्तीने कोयत्याने पहिला वार सोनवणे यांच्या खांद्यावर केला. त्यानंतर दुसरा केला. परंतु सोनवणे यांनी तो वार चुकविला. यानंतर संबंधित हल्लेखोर तेथून पसार झाला. जखमी सोनवणे यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतल्यानंतर सोमवारी रात्री पावणेएक वाजता गुन्हा दाखल केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नसून, सहायक पोलिस निरीक्षक शितोळे हे अधिक तपास करीत आहेत.

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद ..महेश सोनवणे यांची पुण्यात कंपनी आहे. मात्र, साताऱ्यात त्यांचे घर असल्याने ते पुण्यातून  जाऊन-येऊन करतात. गेल्या काही दिवसांपासून संशयित हल्लेखोर तोंडाला मास्क लावून त्यांचा पाठलाग करत होता. मात्र, कोणीतरी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. ही घटना घडून गेल्यानंतर त्यांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहिले तेव्हा संबंधित हल्लेखोर मास्क लावून फिरत असताना दिसून आला. त्यांचा कोणाशीही वाद नाही. असे असताना संबंधित हल्लेखोर खुनाच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी हल्लेखोराला तातडीने अटक करावी, अशी मागणी सोनवणे यांच्या कुटुंबाने पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस