शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:57 IST

राजापूर, साताऱ्यात घडला प्रकार

सातारा : पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून तब्बल १३ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात साताऱ्यातील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष श्रवण लोखंडे (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत जहीर अब्बास मनचेकर (वय ४०, रा. विलये, ता. राजापूर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपीसोबत साताऱ्यातील एका मित्राने ओळख करून दिली. आरोपी हा पैसे दुप्पट करून देतो, अनेकांचा त्याने फायदा केला आहे, असे सांगितले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला. संशयित आरोपीने ‘माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे. त्याचा वापर करून मी पैशांचा पाऊस पाडतो व पैसे डबल करून देतो,’ असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी १३ लाख रुपये त्याला दिले. मात्र, त्याने पैसे परत दिले नाहीत. तसेच मित्र अभिषेक साळस्कर मुंबई, उदय सावंत, नथ पुजारी, झिपरू शिंदे यांचीही अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे मनचेकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी त्याचे घर गाठले. परंतु, संशयित आढळून आला नाही, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

राजापूर, साताऱ्यात घडला प्रकारफसवणुकीचा हा प्रकार जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत राजापूर, रत्नागिरी तसेच साताऱ्यातील वाढे फाटा परिसरातील एका लाॅजमध्ये घडला आहे. या घटनेची तक्रार फिर्यादी मनचेकर यांनी २ ऑगस्ट रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.