शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

By दत्ता यादव | Updated: March 5, 2025 14:01 IST

आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी, ता. जावळी टोलनाक्यापासून जवळच मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवून ३२ मुला-मुलींना तातडीने बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारी ३२ मुले आणि मुली लक्झरी बसने साताऱ्याकडे यायला निघाली. ही मुले सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील सुझलाॅन कंपनीत प्रोजेक्टसाठी येत होती. आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतर पुढे आल्यानंतर बसच्या पाठीमागील भागात आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.यानंतर चालकाने बस सेवारस्त्यावर वळवली. तातडीने मुला-मुलींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. बसला अचानक आग लागल्याने मुले भयभीत झाली. हातात येतील तशा बॅगा व इतर साहित्य घेऊन मुले काही मिनिटांतच बसमधून खाली उतरली. काही नागरिकांनी तातडीने या घटनेची अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

या आगीत बसमधील सीट जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास धस आणि भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या आयआयटीच्या मुलांसाठी दुसरी लक्झरी बस उपलब्ध करून दिली. त्यानंतर मुले चाळकेवाडीकडे आपल्या प्रोजेक्टसाठी रवाना झाली. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIIT Mumbaiआयआयटी मुंबईStudentविद्यार्थीfireआग