सातारा : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी जवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता मृत्यू बिबट्या हा नर जातीचा असून याचे वय अंदाजे दोन वर्ष आहे. मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या वैद्यकीय विभागात ठेवण्यात आले. अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्गापर्यंत या बिबट्याचा आधिवास होता. रात्री शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
साताऱ्यात खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By दीपक शिंदे | Updated: October 4, 2022 13:57 IST