शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू, सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:36 IST

दोषीवर गुन्हा दाखल करा..

सातारा : सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अछ्छेलाल अमीरे कोल (वय २३, रा. सिध, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.सातारा रेल्वेस्थानकात पार्सल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खिडक्या, दरवाजाचे काँक्रिटचे लाॅफ्ट तयार करण्यात आले. ९ इंची भिंतीच्या दरवाजावर ५ फूट लांब ३ फूट रुंद तसेच चार इंच जाडीचा अंदाजे २०० किलो वजन असलेला सिमेंटचा लाॅप्ट बसविण्यात आला होता. या लाॅप्टखाली लावण्यात आलेला प्लायवूड कामगार अछ्छेलाल कोल हा काढत होता. त्यावेळी अचानक सिमेंटचा दोनशे किलोचा लाॅप्ट त्याच्या अंगावर पडला. यात कोल याचा जागीच मृत्यू झाला.दुसरी दुर्घटनापंधरा दिवसांपूर्वीही याच इमारतीच्या बांधकामावरील लाॅप्ट कोसळून एक कामगार जखमी झाला होता. त्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दोषीवर गुन्हा दाखल करा..इमारतीचे बांधकाम घेतलेले मुख्य ठेकेदार कंपनी मुंबईस्थित असून, त्या कंपनीने दुसरा ठेकेदार नेमला आहे. त्या ठेकेदाराने तिसऱ्या ठेकेदाराला लेबर वर्कवर काम दिले आहे. सध्या हे काम थर्ड पार्टी ठेकेदार करत आहे. याची चाैकशी व्हावी. मयत कामगाराच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत रेल्वे आणि ठेकेदार यांनी द्यावी. सर्व कामगारांचा अपघाती विमा उतरवण्यात यावा. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सातारा रेल्वे स्टेशनचे सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम यांनी केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेDeathमृत्यू