शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील येरवळेच्या जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, आसाममध्ये सेवा बजावताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:47 IST

दोन वर्षांनी ते सैन्य दलातून सेवानिवृत्त होणार होते

कऱ्हाड : येरवळे, ता. कऱ्हाड येथील जवान सूरज मधुकर यादव (वय ३२) यांचा सैन्य दलात धीमापूर-आसाम या ठिकाणी सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजल्याने गावातील वातावरण सुन्न झाले. त्यांचे पार्थिव विमानाने बुधवारी (दि. २१) पुण्यात येणार असून, त्यानंतर गावाकडे आणण्यात येणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.येरवळे येथील सूरज यादव हे २००७ मध्ये सैन्य दलात भरती झाले. काही वर्षे पुण्यात तर त्यानंतर उत्तर प्रदेशच्या बरेली भागात त्यांनी सेवा बजावली. दक्षिण आफ्रिकेला शांतिदूत म्हणूनही ते गेले होते. सध्या नागालँड-आसाम या ठिकाणी १११ इंजिनिअर रेजिमेंट विभागात धीमापूरमध्ये ते सेवा बजावत होते. त्याच ठिकाणी सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.रात्री अकराच्या सुमारास याबाबतची माहिती सैन्य दलातून फोनद्वारे नातेवाइकांना देण्यात आली. या घटनेमुळे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. तसेच गावातील वातावरणही सुन्न झाले.सूरज यांचे वडील मधुकर यादव हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. सूरज हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तीन महिन्यांपूर्वी गणेश जयंतीला सूरज हे गावी येरवळे येथे आले होते. तर दोन वर्षांनी ते सैन्य दलातून सेवानिवृत्त होणार होते.

मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला येणार होते गावीसूरज यादव यांचा २०१६ मध्ये विवाह झाला आहे. लग्नानंतर त्यांना ७ ते ८ वर्षांनी मुलगा झाला होता. त्या मुलाचा पुढील महिन्यात पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सूरज गावी येणार होते. तत्पूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अकरा महिन्यांच्या चिमुकल्या कृष्णावंशचे पितृछत्र हरपले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकDeathमृत्यू