शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Satara: स्वयंपाक सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:53 IST

कऱ्हाड : स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी ...

कऱ्हाड : स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला आग लागून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.विंग येथील पाणंद नावच्या परिसरात तानाजी पांडुरंग कणसे यांचे राहते घर आहे. त्यांच्या घरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक धूर येऊ लागल्याने घरात असलेले तानाजी कणसे, त्यांची पत्नी, दोन मुले व वृद्ध आई घरातून बाहेर पळाले. त्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये सिलिंडर तब्बल २५ फूट हवेत उडाले.स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच आग विझविण्यासाठी कऱ्हाड पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कणसे यांचे घर जळून खाक झाले होते. या आगीत रोख रकमेसह सोने व संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. वेळीच घरातील सर्वजण बाहेर पळाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर तलाठी फिरोज आंबेकरी, क्लार्क संजय पाटील व अमोल चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये तब्बल सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगBlastस्फोटCylinderगॅस सिलेंडर