शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Satara Crime: जिममधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी अखेर जिमट्रेनरला अटक 

By दत्ता यादव | Updated: May 6, 2023 13:48 IST

गुन्हा दाखल झाल्यानंतर झाला होता फरार

सातारा : जिममध्ये आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या जिमट्रेनरला अखेर चार दिवसांनंतर पकडण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले. ही कारवाई शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली.रामसिंग असे पोलिसांनी अटक केलेल्या जिमट्रेनरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका जिममध्ये रामसिंग हा ट्रेनर आहे. त्या जिममध्ये एक १७ वर्षीय तरूणी व्यायामासाठी जात होती. दि. २ मे रोजी सकाळी दहा वाजता संबंधित पीडित तरूणी जिमला गेली होती. त्यावेळी जिम ट्रेनर रामसिंग याने पीडितेला आॅफिसमध्ये बोलावून घेऊन ‘तुझे फॅट्स वाढलेले आहेत.’ असे बोलून चुकीचा स्पर्श केला. तसेच पीडितेला चेजिंगरुमपर्यंत ढकलत नेले. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केले. या प्रकाराची माहिती पीडित तरूणीने तिच्या घरातल्यांना सांगितल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी रामसिंगवर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल केला.  मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर रामसिंग हा फरार झाला होता. शनिवारी सकाळी शहरातील एका बंगल्यात तो असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी रामसिंगला अखेर चार दिवसांनंतर त्या बंगल्यातून अटक केली. महिला पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस