शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली अंगावर पडून बालिकेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 22:16 IST

भाकरी घेऊन येत असताना मृत्यूने घातला घाला

वडूज : धकटवाडी गावाच्या हद्दीत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्राँली पलटी होऊन ऊस मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे ( वय -१२ ) हिचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवार दि. १७ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गायत्री लकी शिंदे ,झिंगाट साजन शिंदे व सजनी अमर काळे हे उपजिवेकेसाठी भाकरी घेऊन तिघे रस्त्याने जात होते. यावेळी त्या तिघी धकटवाडी हद्दीमध्ये आले असतानाच ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम.एच. १० / ए वाय ८४७९ भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत आलेला दिसल्याने  बाजूला जाण्याचा प्रयत्न केला असता ट्राँलीमधील ऊस मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे ही अडकून पडली. तेथील रस्त्यावरून येणार्‍या- जाणार्‍या  लोकांनी ऊसाच्या मोळ्या काढून ऊसाच्या खाली अडकून पडलेल्या जखमी सजनी काळे हिला वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच ती मृत्यू पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर अपघाताची माहिती मिळताच सपोनि मालोजीराव देशमुख व पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून ट्रॅक्टर चालक चौडाप्पा प्रभू पूजारी ( वय -३९ ) इंडी ता. विजापूर  , कर्नाटक राज्य याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार शांतीलाल ओंबासे करीत आहेत.

टॅग्स :satara-acसाताराAccidentअपघातDeathमृत्यू