शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

'ग्रेड सेपरेटर'ला राजधानी लूक, ऐतिहासिक साताऱ्याची अनुभूती येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 17:54 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही प्रगतीपथावर असून याठिकाणीही अत्यंत सुंदर सजावट आणि तटबंदी करण्यात येणार आहे.

दीपक शिंदेसातारा : राजधानी सातारा म्हणून साताऱ्याची ओळख होत असताना आता ग्रेड सेपरेटरच्या आगमन आणि निर्गमन मार्गावर राजवाड्याच्या घुमटाकर प्रतिकृती बसविण्यात येणार आहेत. यामुळे ऐतिहासिक शहरात असल्याची अनुभूती सर्वांनाच येणार असून बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांनाही साताऱ्यात आल्यानंतर ऐतिहासिक साताऱ्याची जाणीव या प्रतिकृतींवरून होणार आहे.साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमुळे शहराचे वेगळेच दर्शन होते. ग्रेड सेपरेटरमधून अजूनही फारशी वाहतूक होत नसली तरी भविष्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने त्याचा महत्त्वाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे राजवाड्याकडून बस स्टँण्डकडे जाताना आणि बस स्टँण्डकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाडकडे जाताना लागणाऱ्या ग्रेड सेपटेवर घुमटाकार कमानी बसविण्यात येणार आहेत. त्याची रेखाचित्रे तयार करण्यात आली असून काही दिवसातच याचे काम सुरू होणार आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ही ठिकाणे सेल्फी पॉईंट म्हणूनही विकसित होणार आहेत. सेल्फीच्या माध्यमातून ती सर्वत्र पोहचतील आणि साताऱ्याची ऐतिहासिक सातारा म्हणून ओळख होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील, असा विश्वास आहे.सातारा नगरपालिकेच्यावतीने हे काम करण्यात येणार असून पुढील ३ ते ४ महिन्यात ते पूर्णत्वास जाणार आहेत. याबाबत कामाचे आदेश देण्यात आले असून हे काम लवकरच सुरू होणार आहे. ग्रेड सेपरेटरच्या सर्व कमानींवर या प्रतिकृती बसविण्यात येणार असून पोवईनाक्याचा परिसर आणखी दिमाखदार होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही प्रगतीपथावर असून याठिकाणीही अत्यंत सुंदर सजावट आणि तटबंदी करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचेही प्रस्तावित आहे.सातारा शहराच्या वैभवात पडणार भरसातारा शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सातारा पालिकेकडून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. ग्रेड सेपरेटवर राजवाड्याच्या घुमटाकर प्रतिकृती हा त्याचाच एक भाग आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर पोवईनाकाच नव्हे तर सातारा शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

ऐतिहासिक साताऱ्याचे वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नामवंत आर्किटेक्चरकडून याबाबतचे संकल्पाकृती तयार करण्यात आल्या असून हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात तर भर पडेलच. पण, शहराचे ऐतिहासिक महत्त्व आपल्याला टिकवून ठेवता येणार आहे.  - अभिजीत बापट, प्रशासक, सातारा नगरपालिका

टॅग्स :Satara areaसातारा परिसर