शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Satara: क्राईम ब्रँचमध्ये असल्याचे सांगून डॉक्टरला दीड लाखाचा गंडा

By दत्ता यादव | Updated: June 12, 2024 15:22 IST

सातारा : क्राईम ब्रँचमध्ये असल्याचे सांगून डॉ. नारायण विष्णू जोग (वय ६७, रा. शेंद्रे, ता. सातारा) यांना तिघांनी १ लाख ६० हजारांचा गंडा ...

सातारा : क्राईम ब्रँचमध्ये असल्याचे सांगून डॉ. नारायण विष्णू जोग (वय ६७, रा. शेंद्रे, ता. सातारा) यांना तिघांनी १ लाख ६० हजारांचा गंडा घातला. ही घटना दि. ११ रोजी सकाळी साडेआठ वाजता शेंद्रे, ता. सातारा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. नारायण जोग हे सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या घरापासून जवळच एक तरुण तेथे आला. मी क्राईम ब्रॅंचमध्ये आहे. इकडील परिसरात गांजा, दारू, ब्राऊन शुगर, ड्रग्ज असे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून माझ्याकडे द्या. मी तुमचे दागिने रुमालात गुंडाळून तुमच्या खिशात ठेवतो, असे सांगितले. त्यानंतर डॉ. जोग यांनी साडेतीन तोळ्यांची सोन्याची अंगठी, गळ्यातील चेन तसेच पैशाचे पाकिट काढून दिले. हा ऐवज रुमालात बांधून डॉ. जोग यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवून निघून गेला. त्याच्यासोबत अन्य दोघे जण होते. ते सद्धा लगोलग निघून गेले. काही वेळानंतर डॉ. जाेग यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये काहीच नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हवालदार निकम हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस