शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पितृदोष काढण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदू बाबावर गुन्हा, पोलिस-‘अंनिस’ची संयुक्त कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:42 IST

घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवण्याचे आश्वासन देत पैसे उकळले 

रहिमतपूर : घरावर पितृदोष असल्याचे सांगत दोष काढण्याचे आमिष दाखवून साडेतीन हजाराला ठगवणाऱ्या भोंदूबाबाला रहिमतपूर पोलिस आणि ‘अंनिस’ने सापळा रचून पकडले. याप्रकरणी जंगू अब्दुल मुलाणी (वय ७२, रा. अंभेरी, ता. कोरेगाव) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रहिमतपूर येथील सुभाषचंद्र आप्पासो मदने (वय ६७) यांच्या घरात गेली अनेक वर्षे कौटुंबिक वाद विवाद सुरू आहे. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी कुणाकडून योग्य मार्गदर्शन मिळतोय का? यासाठी ते प्रयत्न करत होते. या दरम्यान त्यांना कुणीतरी अंभेरी येथील परिसरातील बाबा जंगू अब्दुल मुलाणी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. या बाबाची भेट घेतल्यानंतर त्याने सुभाषचंद्र मदने यांना त्यांच्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवण्याचे आश्वासन दिले. यासाठी १० हजार खर्च होईल. मात्र, तुमची परिस्थिती पाहून ७ हजारांत काम करणार असल्याचे सांगितले. तसेच घरावर केलेली करणी व भानामती काढून पितृदोष दूर करण्यासाठी वाळू, पाणी व उडीद यांचे मिश्रण करून घराभोवती टाकण्यास सांगितले. घरातील जेवणामध्ये अंगाराही टाकण्यास दिला व लिंबाचा अंगारा लावून घरावरून उतरून टाकण्यास सांगितले. यासाठी सुभाषचंद्र मदने यांच्याकडून बाबाने वेळोवेळी साडे तीन हजार रुपये घेतले. मात्र, एवढे पैसे देऊन व सांगितलेले उपाय करूनही मदने यांना अपेक्षित फरक जाणवला नाही. त्यामुळे अंभेरीच्या बाबांनी आपली फसवणूक केल्याची जाणीव झाल्यानंतर मदने यांनी ‘अंनिस’कडे तक्रार केली होती.रहिमतपूरचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड यांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक व्ही. आर. खुडे, हवालदार तुषार काळंगे यांच्यासह ‘अंनिस’चे कार्यकर्ते शंकर कणसे, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, मधुकर माने, सीताराम चाळके, सीताराम माने, चंद्रहार माने आदी सहभागी झाले होते.गॅरेजमध्ये पकडले...जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये रहिमतपूर व पिंपरी येथील ‘अंनिस’ कार्यकर्ते आणि रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदूबाबा जंगू मुलाणी याला बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास रहिमतपूर येथील वाठार रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये रंगेहात पकडले. यामुळे एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस