शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:41 IST

महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत अपघात

मलकापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास अपघात झाला. अचानक ब्रेक मारल्यामुळे एका कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या कंटेनरची धडक झाली. या अपघातात पाठीमागील कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर सातारा बाजूकडे जात होता. अचानक या कंटेनरच्या चालकाने ब्रेक लावल्यावर, सातारा दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनर (नंबर प्लेट केए ५४ एजे ५०१०)ने त्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, महादेव लावंड यांच्यासह कर्मचारी त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची तक्रार कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपनिरीक्षक भोईटे आणि कोळी तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकाला त्वरित रुग्णालयात दाखल केले गेले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.