शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बिअरच्या बाटल्या भरलेल्या मालट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक; चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:27 IST

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत अपघात, मालासह वाहनांचे नुकसान 

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत बिअरच्या बाटल्या भरून उभ्या असलेल्या मालट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक झाली. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला तर मालासह वाहनांचे मोठे नुकसान आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक हा भिवंडीहून बियरचे बॉक्स घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत आला असता चालकाने ट्रक महामार्गाकडेला थांबवला. त्याच वेळी पाठीमागून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक झाली. या धडकेत ट्रक महामार्गावरच आडवा झाला. ट्रकमधील बियरच्या बाटल्या भरलेली खोकी महामार्गावर पडल्याने फुटून काचांचा खच पसरला होता.या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच क्रेनचालक सुनील कदम, राहुल कदम हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. अपघाताची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाला दिली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

बाटल्यांची पळवापळवीनांदलापूर येथे सोमवारी सकाळी बियरचे बॉक्स घेऊन निघालेल्या ट्रकचा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील बियरच्या बाटल्या भरलेले बॉक्स महामार्गावरच पडले होते. त्यामधील काही बाटल्या फुटल्या तर काही सुस्थितीत होत्या. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी जाऊन बियरच्या बाटल्यांची पळवापळवी केली.

दुसऱ्या अपघातात वळण मार्गावर ट्रेलर घुसलानांदलापूर गावच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास अन्य एक अपघात झाला होता. या अपघातात कोल्हापूरकडून पुण्याकडे निघालेल्या ट्रेलर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळण मार्गावर तो सरळच घुसला. सुरक्षा कठड्याला धडक होऊन ट्रेलरचे नुकसान झाले आहे.