शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:07 IST

अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा

सातारा : सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव (रा. धादमे कॉलनी, करंजे पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा आहे.सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोग्य निरीक्षक यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन १ जानेवारी २०१० ते ८ जानेवारी २०२० यादरम्यान वेळोवेळी झालेल्या तपासणीमध्ये प्रवीण यादव यांनी एकूण उत्पन्न स्रोताच्या २८.१ टक्के अधिक संपत्ती गैर मार्गाने मिळवल्याचे स्पष्ट झाले. ही अपसंपदा ११ लाख ७० रुपये इतकी आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ते’ प्रकरण पुन्हा चर्चेत..पाच वर्षांपूर्वी सातारा पालिकेत अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्याधिकाऱ्यासह आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यामध्ये प्रवीण यादव यांचा समावेश होता. या प्रकरणात त्यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू होती. त्या चाैकशीत त्यांच्याकडे ११ लाखांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. हे जुने प्रकरण आता पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग