शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘त्या’ दोन भोंदू मांत्रिकांवर अखेर गुन्हा दाखल, पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिषाने ३६ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:01 IST

सातारा/म्हसवड : हवेतून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह चाैघांना तब्बल ३६ लाखांना गंडा घालण्यात आला होता. ...

सातारा/म्हसवड : हवेतून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह चाैघांना तब्बल ३६ लाखांना गंडा घालण्यात आला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल घेऊन पोलिसांनी ‘त्या’ दोन भोंदू मांत्रिकांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अखेर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.मंगेश गौतम भागवत (वय ३२, रा. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे), सर्जेराव संभाजी वाघमारे (७०, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्या भोंदू मांत्रिकांची नावे आहेत. कांता वामन बनसोडे (६०, रा. देवापूर, ता. माण) हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिकांनी दैवीशक्ती व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडत असल्याचे त्यांना व त्यांच्यासह अन्य चाैघांना आमिष दाखविले. पूजेच्या साहित्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये बनसोडे यांनी सर्वांच्यावतीने वेळोवेळी फोन पेद्वारे भोंदू मांत्रिकांना पाठविले. ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडून मांत्रिकाने घरातील देवीसमोर बनसोडे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त सहा बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये तब्बल ३० कोटी रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले; पण हे बाॅक्स उघडल्यानंतर त्यामध्ये वर्तमानपत्रांची रद्दी निघाली. आपली फसवणूक झाल्याचे बनसोडे व अन्य लोकांना समजल्यानंतर भोंदू मांत्रिकांकडे त्यांनी पैसे परत मागितले. परंतु त्यांचे पैसे परत दिले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून तक्रारदार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची काेणीही दखल घेतली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस