शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह घरात लावला, पोलिस येताच गोंधळ उडाला; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:58 IST

मुला-मुलीच्या आईवरही गुन्हा दाखल

सातारा : १६ वर्षांची वधू, तर १८ वर्षांचा वर. घरात मोजकेच वऱ्हाडी. शुभमंगल सावधान म्हणून वऱ्हाडी मंडळी व नातलगांनी वधू-वराच्या अंगावर अक्षता टाकल्या. वधूच्या गळ्यात वराने मंगळसूत्रही घातलं. एवढ्यात सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांना पाहून वऱ्हाडी मंडळींची मात्र पळताभुई थोडी झाली. या बालविवाहप्रकरणी मुला-मुलीच्या आईसह लग्न लावणाऱ्यांवरही सातारा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ही घटना सोमवारी (दि. ७) अजंठा चाैक परिसरात घडली.साताऱ्यातील अजंठा चाैक परिसरातील गोपाळ वस्तीवरील एका घरात बालविवाह लावला जात असल्याची माहिती अज्ञाताने डायल ११२ ला कळविली. पोलिसांनी तातडीने पालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधून तेथे जाण्याच्या सूचना दिल्या. पालिकेचे नितीन साखरे यांनी पोलिसांना सोबत घेऊन तातडीने तेथे धाव घेतली. त्यावेळी बालविवाह पार पडला होता. परंतु तो मी नव्हेच, असे समजून वऱ्हाडी मंडळी इकडे-तिकडे धावाधाव करून लागली. वधूच्या व वराच्या आईसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस गाडीत घालून सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. बालविवाहास प्रोत्साहन देऊन त्यांचे लग्न लावले, या कारणावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार देशमुख अधिक तपास करीत आहेत.

घराबाहेर आवाज न येता लग्न..लग्नसमारंभ म्हटलं की नुसता गोंधळ असतो. पण हा बेकायदा मामला असल्याने त्या घरात शांतता होती. घरात काही तरी सुरू आहे, असे काहींना वाटत होते. पण प्रत्यक्षात लग्नसोहळा होता. लपून-छपून हा सोहळा होत असल्याने जागृत नागरिकाने पोलिसांना कळविले आणि या बालविवाहाचा भांडाफोड झाला.