शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेश सचिवावर गुन्हा दाखल!, जातीय तेढ निर्माण केल्याची पोलिसांत तक्रार

By प्रमोद सुकरे | Updated: October 19, 2022 15:38 IST

पावस्कर यांच्यावर आयपीसी १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कराड : वाठार स्टेशन( ता. कोरेगाव) येथील ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुर्गा उत्सवाच्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार हमीद खान व नुरखान पठाण यांनी कोरेगाव पोलिसात दिली आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक १८ रोजी विक्रम पावस्कर यांच्यावर आयपीसी १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी विक्रम पावसकर यांनी एका कार्यक्रमात धर्माबद्दल अपशब्द वापरून, चिथाणीखोर भाषण करून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. असे तक्रारदारांनी म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस एस बनकर हे करीत आहेत.

संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने पीएफआयचे आतंकवादी विचाराचे जिहादी सापडत आहेत. देशाचे तुकडे करणे हे त्यांचे मनसुबे आहेत. याच ज्वलंत प्रश्नावर दुर्गामाता दौड सांगता कार्यक्रमात मी माझे मत व्यक्त केले होते. त्यामुळे मी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे असे मला वाटत नाही.  -विक्रम पावसकर, प्रदेश सचिव, भारतीय जनता पक्ष  जिल्हाध्यक्ष सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी