शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

Satara: शेंद्रेजवळ कारची ट्रकला धडक; एकजण ठार, पाच गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:13 IST

अंत्यविधीला जाताना घडली घटना: जखमी सांगली, चिपळूणमधील रहिवासी

सातारा : पुणे येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. १ रोजी पहाटे साडेचार वाजता शेंद्रे, ता. सातारा येथे झाला. अपघातग्रस्त सांगली आणि चिपळूणमधील रहिवासी आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विठ्ठल गोविंद तारळेकर (वय ७६, रा. झुलेलाल चाैक, सांगली) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर पूजा नितीन तारळेकर (वय ३०), त्यांचा मुलगा देवांश नितीन तारळेकर (वय अडीच वर्ष), नितीन विठ्ठल तारळेकर (वय ३६, सर्व रा. झुलेलाल चाैक, सांगली), राजेश्वरी महेंद्र लोकरे (वय १६), विरधवल महेंद्र लोकरे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.हे सर्वजण सांगलीवरून कारने (एमएच १० बीएम ४२४८) पुण्यातील नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघाले होते. यावेळी नितीन तारळेकर हा कार चालवित होता. शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील राजस्थान ढाब्यासमोर आल्यानंतर महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये कारच्या पुढच्या सीटवर बसलेली पूजा तारळेकर त्यांचा मुलगा देवांश यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर कारमध्ये पाठीमागे बसलेली राजेश्वरी, वीरधवल आणि विठ्ठल तारळेकर यांच्याही डोक्याला, हाता पायाला गंभीर जखम झाली. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विठ्ठल तारळेकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सर्व जखमींवर सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार किशोर वायदंडे आणि हवालदार विशाल माेरे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग