शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भावकीतीलच मुलावर जडले प्रेम; बदनामीच्या भिती पोटी जन्मदात्यांनीच केला पोटच्या मुलीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:03 IST

क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून होते.

क-हाड/कुसूर (जि. सातारा) : भावकीतीलच मुलाच्या प्रेमात पडलेल्या १७ वर्षीय मुलीचा जन्मदात्या आईवडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून खून केल्यानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह डोंगरात पुरला होता. पोलिसांनी पंधरा दिवसांनंतर मृतदेह बाहेर काढला.

भावकीतीलच युवक जो नात्याने चुलता लागतो, त्याच्या प्रेमात मुलगी पडली पडली होती. दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचे नक्की केले होते. मात्र, ही सोयरीक पसंद नसल्यानेच आई. वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून होते. त्यांनी मुलीला संपविण्याचा निर्णय घेतला. १७ एप्रिल रोजी समजूत घालण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला जवळच असलेल्या मामाच्या गावाकडे नेले. त्याठिकाणी निची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, तरीही मुलगी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आई-वडील मुलीला घेऊन डोंगर परिसरात गेले. त्याठिकाणी त्यांनी दोरीने गळा आवळून मुलीचा खून करून मृतदेह डोंगरामध्ये काढलेल्या खड्यात पुरला.दुसऱ्या दिवशी मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेल्याचे सांगत त्यांनी कहाड ग्रामीण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गत पंधरा दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. गावात केलेल्या चौकशीवरून संशय बळावला. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आई-वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

चार दिवस बाप खोदत होता खड्डापोटच्या मुलीचा खून करण्यापूर्वी सलग चार दिवस बाप डोंगरात एकटाच खड्डा खोदत होता. त्यानंतर समजूत घोलण्याच्या बहाण्याने बापासह आईने मुलीला त्या खड्याजवळ नेले. बापाने गळा आवळला. तर आईने तडफडणाया मुलीचे पाय आवळले. त्यानंतर मृतदेह खड्डयात पुरून हे दोघेही निर्विकार चेहयाने घरी निघून गेले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKaradकराड