शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Satara: डेंग्यूची लागण, उपचारादरम्यान हृदयाचे ठोके बंद पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:39 IST

प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं

सातारा : साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शौर्य संदीप खामकर या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूनेमृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. डेंग्यूने जिल्ह्यातील आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील एका युवकाचाही डेंगूने मृत्यू झाला आहे.शौर्य हा साताऱ्यातील एका शाळेत सातवीत शिक्षण घेत होता. रविवारी मध्यरात्री त्याला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सकाळी साडेसात वाजता कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला शहरातील अन्य एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल दुपारी प्राप्त झाला. यामध्ये शौर्य याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती थोडी गंभीर असल्याने शौर्यला साताऱ्यातील आणखी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्याला पुणे येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचारानंतर शौर्यच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. परंतु, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले अन् त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खामकर कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने थोडं गांभीर्याने घ्यावंजिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभाग, हिवताप विभाग व पालिका प्रशासनाकडून डेंग्यू प्रतिबंधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली असून, शहरात डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजनांची गती वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdengueडेंग्यूDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल