शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, १३ वर्षीय परप्रांतीय मुलाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:16 IST

पत्र्याच्या शेडच्या चिंधड्या; परिसर हादरला

उंडाळे : गॅसची गळती झाल्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन तेरावर्षीय मुलगा जागीच ठार झाला. उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गॅस सिलिंडरचा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटामुळे पत्र्याचे शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तसेच मोठ्या आवाजाने परिसरही हादरून गेला.अंकित श्री गोविंद सिंग (१३, मूळ रा. बिहार, सध्या रा. उंडाळे) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. उंडाळे येथे काही परप्रांतीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. संबंधित कुटुंबे मूळची बिहार राज्यातील असून, उंडाळे येथे उपजीविकेसाठी ते वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये ते राहतात. शेडमध्येच आइस्क्रीम तयार करून त्याची विक्री ते परिसरामध्ये करीत असतात. या कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावाहून अंकित या तेरावर्षीय मुलाला कामासाठी उंडाळे येथे आणले होते. इतर कुटुंबीयांसमवेत संबंधित मुलगा काम करीत होता.सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंकित हा शेडनजीक अंघोळ करीत होता. त्यावेळी शेडमध्ये असलेल्या गॅस सिलिंडरच्या टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने तसेच टाकीचे तुकडे लागल्यामुळे अंकितचा जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संबंधित मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच साहित्य इतरत्र विखुरले होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. गॅसगळतीमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक फौजदार एस. जी. जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडBlastस्फोटDeathमृत्यू