शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडे पाच फुटांवर कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:42 IST

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४६, नवजा ४५ आणि महाबळेश्वर सर्वाधिक ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवकच होत असल्याने विसर्ग सुरू आहे. धरणाचे सहाही दरवाजे साडे पाच फुटावर कायम आहेत. तसेच इतर प्रमुख धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडे पाच फुटांवर कायम...सर्व धरणांतून विसर्ग सुरूच : महाबळेश्वरला सर्वाधिक ५४ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४६, नवजा ४५ आणि महाबळेश्वर सर्वाधिक ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवकच होत असल्याने विसर्ग सुरू आहे. धरणाचे सहाही दरवाजे साडे पाच फुटावर कायम आहेत. तसेच इतर प्रमुख धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात तुफान पाऊस पडत होता. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवीन विक्रम नोंदविला. या धुवाँधार पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. कोयनासारख्या धरणात एका दिवसांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढला. हा आतापर्यंतचा एक विक्रम ठरला. पाण्याची आवक वाढल्याने सर्वच धरणे भरु लागली आहेत.मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील साठा ९०.९९ टीएमसी झाला होता. धरणाचे सर्व सहा दरवाजे साडे पाच फुटांवर उघडण्यात आलेले आहेत. त्यातून ३३४८८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्यूसेक पाणी सोडणे सुरुच आहे. त्यामुळे कोयनेतून ऐकूण ३३४८८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. त्यामुळे कोयनेला पूर कायम आहे.दरम्यान, जूनपासून कोयनेला २९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला ३७४४ आणि महाबळेश्वर येथे ३७३५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर जावळी, वाई, पाटण, सातारा या तालुक्यांतही चांगला पाऊस होत आहे.प्रमुख धरणांतील विसर्ग असा :मंगळवारी सकाळच्या सुमारास धोम धरणातून ४००८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. कण्हेरमधून ४३६१, कोयना ३३४८, बलकवडी ६६१, तारळी ३१६५ आणि उरमोडी धरणातून १६५१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर