शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोयना नव्वदी पार, धरण भरण्यासाठी हवे १५ टीएमसी; सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:02 IST

२४ तासांत नवजालाच १९ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असून, २४ तासांत नवजा येथेच सर्वाधिक १९ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणातील पाण्याची आवकही घटली आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्याने ९० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे.जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला हाेता. त्यामुळे पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणात पाणी येण्यास सुरुवात झालेली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. तर पूर्व भागात दमदार पाऊस झाल्याने छोट्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला होता. यामुळे दुष्काळाची स्थिती निवळली. पण, जुलै महिना उजाडल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. जुलैच्या मध्यावर सुरू झालेला पाऊस महिना संपेपर्यंत सुरूच होता. या काळात पश्चिमेकडील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात अतिवृष्टी होती. जवळपास १२ दिवस पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या अतिवृष्टीमुळे छोटे पाणी प्रकल्प भरून वाहिले. तर कोयनेसह प्रमुख मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही धरणे ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान भरली आहेत. त्यामुळे धरणाबद्दलची चिंता कमी झाली आहे. अजूनही पावसाचा दीड महिना बाकी आहे. त्यामुळे धरणे भरू शकतात. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाची उघडीप आहे.जिल्ह्यात मागील १२ दिवसात कमी पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून तर उघडीप आहे. पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९, नवजाला १९ आणि महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटर पर्जन्यमनाची नोंद झाली आहे. पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातही सावकाश आवक आहे. सकाळच्या सुमारास सुमारे साडेसात हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. पाऊस कमी झाल्यापासून कोयनेतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

नवजाला ५,०७४ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. १ जूनपासून नवजा येथे ५ हजार ७४ मिलिमीटरची नोंद झाली, तर कोयनानगरला ४ हजार २८० आणि महाबळेश्वरमध्ये ४ हजार ८३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी नवजाचा पाऊस सहा हजारांपर्यंत, तर महाबळेश्वरला पाच हजार मिलिमीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस