शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अडीच तासांत ८२ टन कचरा हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:58 IST

सातारा : समाजप्रबोधनासह समाजसेवेचा अखंड समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सातारा, कºहाड, पाटण, वाई, कोरेगाव, मेढा या ठिकाणी राबविण्यात आलेल्या ...

सातारा : समाजप्रबोधनासह समाजसेवेचा अखंड समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सातारा, कºहाड, पाटण, वाई, कोरेगाव, मेढा या ठिकाणी राबविण्यात आलेल्या या अभियानात सहभागी झालेल्या २२७६ सदस्यांनी अवघ्या अडीच तासांत ८२.३ टन कचरा गोळा केला. जिल्ह्यात या ठिकाणच्या एकूण १२१.२ किलोमीटर अंतरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.सातारा शहरात रविवारी सकाळी सात वाजता नगरपालिकेसमोर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा प्रारंभ होऊन अभियानास प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानात प्रमुख पाहुणे नगरपालिकेसमोर नगराध्यक्षा माधवी कदम, तसेच ठिकठिकाणच्या परिसरात सातारा जिल्हा न्यायाधीश वाय. एच. अमेठा, आर. डी. देशपांडे, खराडे, मुख्य न्यायदंडाधिकारी डी. बी. माने व इतर न्यायाधीश, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने, डॉ. संजोग कदम, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक किशोर शिंदे, राखीव पोलीस उपनिरीक्षक के. सी. साबळे, आर. आर. पांडे, जी. ए. जावळे, उपकार्यकारी अभियंता सोमनाथ चव्हाण, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे आदी उपस्थित होते.जिल्ह्यात राबविल्या गेलेल्या अभियानात २२७६ सदस्यांनी सहभाग घेतला. सातारा, कºहाड, वाई, कोरेगाव, पाटण, मेढा या ठिकाणी असलेल्या शहरातील मुख्य रस्ते, लगतचा परिसर व शासकीय कार्यालयांसह एकूण १२१.२ किलोमीटर परिसराची स्वच्छता करण्यात आली. गोळा केलेला ८२.३ टन कचरा पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यात आला. सातारा, कºहाड, वाई, कोरेगाव, पाटण, मेढा, पाचगणी, धोंडेवाडी, येळगाव, उंब्रज, अतीत चरेगाव, नेहरवाडी (रहिमतपूर), मसूर, वेळे, अनवडी, अभेपुरी, यशवंतनगर (वाई), गंगापुरी (वाई), सिद्धनाथवाडी (वाई), भुर्इंज, प्रभुचीवाडी, शाहूपुरी, करंजे, बाँबे रेस्टॉरंट, विक्रांतनगर, अंबवडे, कुडाळ, नाटोशी, मारूल हवेली, आगाशिवनगर, कोळे, कोपर्डे, मल्हारपेठ, वत्सलानगर, विद्यानगर, सातारारोड, पाल, तारळे, येथील हजारो सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला. यावेळी प्रतिष्ठानमार्फत राबविलेल्या स्वच्छता मोहिमेतील स्वयंशिस्त व उत्तम नियोजनामुळे अभियान यशस्वीपणे झाले. दरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती.असे आहे धर्माधिकारी प्रतिष्ठान !रेवदंडा, ता. अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरीब-गरजूंना शालेय साहित्य वाटप, मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाहन परवाना काढून नोकरीची संधी, प्रौढ शिक्षण, पाणपोई, प्रवाशांसाठी बस थांबा, तलावातील गाळ काढणे, तैलचित्रातून समाजप्रबोधन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलपुनर्भरण, निर्माल्यापासून खतनिर्मिती असे अनेकविध उपक्रम प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत यशस्वीपणे राबविले आहेत.