‘बीएचआर’ सोसायटीत ८० लाखांचा अपहार

By Admin | Updated: July 6, 2015 00:33 IST2015-07-05T23:19:50+5:302015-07-06T00:33:24+5:30

गुंतवणूकदारांची फसवणूक : अध्यक्ष, संचालकांविरुद्ध शिरवळमध्ये गुन्हा दाखल

80 lakhs in 'BHR' society | ‘बीएचआर’ सोसायटीत ८० लाखांचा अपहार

‘बीएचआर’ सोसायटीत ८० लाखांचा अपहार

शिरवळ : सुमारे ८० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ८० ते ८५ नागरिकांची सुमारे ८० ते ८५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या शिरवळ शाखेचे उद््घाटन मोठा गाजावाजा करत येथील जुना मोटार स्टँडजवळ करण्यात आले. शिरवळ येथील श्रीकांत बाळासाहेब कारळे यांची शाखा व्यवस्थापकपदी नेमणूक करण्यात आली. सोसायटीने अल्पावधीतच अनेक योजना व आमिषे दाखवून ठेवीदारांना आकर्षित करीत बस्तान बसविले. शिरवळ येथील निवृत्त शिक्षक राजाराम शंकर राऊत यांनी मुदत ठेवीवर लाख रुपये गुंतविले. नंतर आपल्या पत्नी व मुलीच्या नावानेही मोठी रक्कम गुंतविली. सोसायटीच्या आमिषाला बळी पडत अन्य दोघांनी सोसायटीमध्ये रक्कम गुंतविली. मुदत संपल्यानंतर राजाराम राऊत सोसायटीच्या शाखेत गेले असता शाखा बंद असल्याचे निदर्शनास आले.
राऊत यांनी शाखा व्यवस्थापक श्रीकांत कारळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जळगाव येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगितले. ‘हे काम तुमचे आहे,’ असे राऊत यांनी सांगितले असता श्रीकांत कारळे यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. रक्कम परत मिळण्याची शक्यता धूसर झाल्यानंतर राऊत यांच्यासह अन्य ठेवीदारांनी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात धाव घेतली. राजाराम राऊत व अन्य ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुदत ठेव व अन्य स्वरूपात ठेवलेल्या रकमेची मुदतपूर्ती होऊनही रक्कम परत न करता ठेवीदारांची फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी, उपाध्यक्ष दिलीप कांतिलाल चोरडिया यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शिरवळ येथील आणखीही अनेक नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असून, फसवणूक झालेल्यांनी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात संपर्क साधावा, असे आवाहन केलेआहे़ (प्रतिनिधी)


उंब्रजमध्ये ‘प्रवेश घोटाळा’
‘दिल्ली येथील एम्स मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमडी’च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो,’ असे सांगून उंब्रज येथील व्यापाऱ्याची ३१ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. /वृत्त २

Web Title: 80 lakhs in 'BHR' society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.