शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:10 IST

अहमदनगर जिल्ह्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल

औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, शहाजी केरा गायकवाड, छगन प्रल्हाद साठे, हनुमंत आबा वायकर, रमेश बलभीम पोडमल, संजय अर्जुन पोडमल, विनोद बळीराम वाईकर, श्रीधर तुकाराम जगताप (सर्व रा. वाकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत औंध पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, ग्रीन पॉवर शुगर्स या कारखान्याला ऊसतोडणी वाहतूक करार २१ जून २०२२ रोजी करून ऊसतोडणी व वाहतूक करण्याकामी येण्यासाठी २२ जुलै २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत कारखान्याच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कडेपूरच्या खात्यावरून ७४ लाख रुपये दिले होते.आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून ग्रीन पॉवर कारखान्याने दिलेल्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून इतर कारखान्यांना ऊस वाहतूक करून कारखान्याची फसवणूक केली असल्याची फिर्याद चंद्रकांत जगनाथ मोहिते हेड क्लर्क शेती विभाग, ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज यांनी दिली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए.ए. ठिकणे तपास करीत आहेत.ऊस हंगामात कारखान्यांची फसवणूकऊस हंगामाच्या काळात अनेक टोळ्या कारखान्यांकडून पैसे उचलतात. मात्र, कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून दिलेल्या पैशाबाबत ठेकेदार बांधिल राहत नाहीत. प्रत्येक हंगामात अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कारखान्यांनी यांत्रिक पद्धतीने ऊसतोडीवर जोर दिला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे कारखान्यांना टोळ्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, टोळीप्रमुख पैशाच्या आमिषाने कारखानदारांचीही फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी