शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

प्रमुख धरणांमध्ये १२५ टीएमसी पाणीसाठा : उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 8:04 PM

पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम

ठळक मुद्दे गतवर्षीपेक्षा १७ टीएमसी अधिक

सातारा : जिल्'ात गेल्यावर्षी सतत पाच महिने झालेल्या पावसामुळे आजही सर्वच धरणात चांगला पाणीसाठा आहे. त्यातच अजूनही सिंचनासाठी मोठा पाणी वापर सुरू नाही. तर जिल्'ातील प्रमुख सहा धरणांची साठवण क्षमता १४८.७४ टीमएसी आहे. सद्य:स्थितीत या धरणातील साठा १२५.३५ टीएमसी आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास १७ टीएमसीने अधिक आहे. तर उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार आहे.जिल्'ात २०१८ या वर्षात दुष्काळी स्थिती होती.

पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून धरणातील साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे २०१९ मध्ये तरी पाऊस होणार का? अशी चिंता लागलेली. पण पावसाने धुवाँधार सुरुवात केली. पश्चिम भागात तर जुलैपासून सतत पाऊस राहिला. हा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे दोनवेळा जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली. कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. याचदरम्यान, पश्चिम भागातील सर्वच धरणे भरली होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत होता. परिणामी नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या.

पूर्व भागात खऱ्या अर्थाने आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. सुरुवातीला परतीचा पाऊस दमदार कोसळला. तर त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवकाळीने कहरच केला. यामुळे शेती पिके, फळबागा, घरांचे मोठे नुकसान झाले. नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबल्या. अशा या पार्श्वभूमिवर जिल्'ात अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी नाही. त्यामुळे धरणात चांगला पाणीसाठा टिकून आहे.जिल्'ातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी या धरणात १०८.४३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १५ जानेवारीला १२५.३५ टीएमसी इतका आहे. म्हणजेच सततच्या पावसामुळे पाणीसाठा टिकून असून, गतवर्षीपेक्षा तो १७ टीएमसीने अधिक आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाºया कोयना धरणातही अजून ८५.९० टीएमसी साठा आहे. तर धोम, कण्हेर, बलकवडी, उरमोडी आणि येरळवाडीतही चांगला पाणीसाठा आहे. सध्या कण्हेर धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू करण्यात आला आहे.उन्हाळा सुरू झाल्यानंतर पिकांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येते. त्यासाठी कण्हेर, उरमोडी, कोयना, धोम अशा सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. सध्या पाणीसाठा चांगला असल्याने शेतीसाठी टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे.जिल्'ातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे यावर्षी गतवर्षी एकूण क्षमताधोम ११.०७ ७.७५ १३.५०कण्हेर ८.६९ ७.५५ १०.१०कोयना ८५.९० ८०.१६ १०५.२५बलकवडी ४.०३ २.०६ ४.०८उरमोडी ९.७७ ५.१८ ९.९६तारळी ४.७६ ४.६८ ५.८५येरळवाडी १.१३ ०.५१ १.१५....................................................

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण