शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST2021-08-19T04:42:39+5:302021-08-19T04:42:39+5:30

कऱ्हाड : येथील पालिकेच्या शिक्षण मंडळाकडील शिक्षकांची दहा टक्केप्रमाणे ६० लाख ८१ हजार ८१० रुपये पगाराची रक्कम मंजूर झाल्यामुळे ...

61 lakh sanctioned for teachers' salaries! | शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर!

शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर!

कऱ्हाड : येथील पालिकेच्या शिक्षण मंडळाकडील शिक्षकांची दहा टक्केप्रमाणे ६० लाख ८१ हजार ८१० रुपये पगाराची रक्कम मंजूर झाल्यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शिक्षकांचे पालिकेकडे येणे बाकी होते. याबाबत पालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी थकीत रक्कम न मिळाल्यास पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. गटनेते राजेंद्र यादव यांनी संघटना पदाधिकारी व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची तातडीने बैठक आयोजित करून थकीत ६१ लाख रुपये दोन दिवसात देण्याचे मान्य केले. याबाबत नगरसंचालक कार्यालकडून अनुदान प्राप्त झाले असून, सर्व थकीत रक्कम अदा करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी यासाठी सहकार्य केले. या बैठकीला आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, एल. बी. गवळी, अरविंद पाटील, अविनाश भोसले, संग्राम गाढवे, विक्रम सपकाळ, सचिन माने, अरुण महामुनी, धोंडिराम चपडे, नामदेव कुरमुडे उपस्थित होते.

Web Title: 61 lakh sanctioned for teachers' salaries!