कोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:47 AM2021-07-29T11:47:47+5:302021-07-29T11:48:30+5:30

Rain Koyna Dam Satara : कोयना धरणा मध्ये सध्या ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी ११ वाजता ४९ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट ०इंच झाली असून धरणामध्ये ९०.४६ टी एम सी पाणीसाठा झाला आहे.

49,000 cusecs of water will be released from Koyna dam | कोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणार

कोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणार

Next
ठळक मुद्देकोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणारकोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा : कोयना धरणा मध्ये सध्या ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी ११ वाजता ४९ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट ०इंच झाली असून धरणामध्ये ९०.४६ टी एम सी पाणीसाठा झाला आहे.

धरणाची वक्रद्वारे दि. २४ जुलै २०२१ पासून ५ फुट ६ इंच वर स्थिर आहेत. सध्या सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण ३३०४५ क्युसेक विसर्ग चालू आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता धरणाची वक्रद्वारे एकूण ९ फूट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण ४९३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: 49,000 cusecs of water will be released from Koyna dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app