जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ४४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:18+5:302021-01-03T04:37:18+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतच असून, शुक्रवारी आणखी ४४ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५४ हजार ...

44 new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ४४ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ४४ रुग्ण

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतच असून, शुक्रवारी आणखी ४४ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५४ हजार ९४५ वर पोहोचला, तर ७० जण कोरोनामुक्त ठरले असून, आतापर्यंत ५२ हजार ७५ जण बरे झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या एक हजार ७९२ झाली.

जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ७० जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील डोळेगाव, वेचले, देगाव येथे, तसेच कऱ्हाड तालुक्यातही रुग्ण आढळले. पाटण तालुक्यातील निसरे, फलटण तालुक्यात गोखळी, साखरवाडी, निंभोरे, राजाळे त्याचबरोबर खटाव तालुक्यातील वडूज, मायणी, निमसोड येथे नवीन रुग्ण सापडले. माण तालुक्याबरोबरच कोरेगाव, जावळी, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांतही नवीन रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, माण तालुक्यातील बोडके येथील ४७ वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला, तर दिवसभरात ४१५ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

...................................................................

Web Title: 44 new corona patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.