जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:31 IST2020-06-20T15:30:41+5:302020-06-20T15:31:52+5:30
सातारा जिल्ह्यात शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, यामुळे जिल्ह्यात आता बळींची संख्या ४० तर बाधितांचा आकडा ८०४ झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी, मुंबईवरून प्रवास
सातारा : जिल्ह्यात शनिवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, यामुळे जिल्ह्यात आता बळींची संख्या ४० तर बाधितांचा आकडा ८०४ झाला आहे.
कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये एका ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आली होती. कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.
दरम्यान, उपचार सुरू असताना संबंधिताचा रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८०४ कोरोना बाधित रुग्ण असून,यापैकी ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ४० जणांचा बळी गेला आहे. सध्या १५८ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.