शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

सातारा जिल्ह्यात आजअखेर सापडल्या ४० हजार ९०९ कुणबी नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 12:33 IST

जिल्हा प्रशासनाने शोधल्या तब्बल १९.१९ लाख नोंदी

सातारा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभर रान पेटवले असतानाच प्रशासकीय यंत्रणांनीही कुणबी दाखले शोधण्याची मोहीम गतिमान केली आहे. जिल्ह्यात नोंदी शोधण्यास प्रारंभ झाल्यापासून आजअखेर तब्बल १९ लाख १९ हजार ३१५ नोंदी तपासल्या आहेत. यापैकी ११ लाख २३ लाख ४५० १९४८ पूर्वीच्या आहेत.जिल्ह्यात सध्या महसूल, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, पोलिस, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख विभाग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा वक्फ अधिकारी विभाग, जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग तसेच सर्व आस्थापना नोंदी तपासणीच्या कामात गुंतल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील तहसीलदारांना याबाबत कक्ष स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्ह्यात ११ तहसील कार्यालयांत कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पुरावे संकलन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याठिकाणी १८६६ पासूनच्या उपलब्ध नोंदी तपासल्या जात आहेत. या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाकडे पाठवल्या जात आहेत. जुन्या नोंदी तपासण्याचे काम क्लिष्ट असून मोडी लिपीतज्ज्ञांची मदतही लागत आहे, तरीही हे आव्हान प्रशासनाने पेलले असून तपासलेल्या १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींपैकी तब्बल ११ लाख २३ लाख ४५० नोंदी या १९४८ पूर्वीच्या आहेत, तर १९४८ ते १९६७ पर्यंत ७ लाख ९५ हजार ८६५ नोंदी तपासल्या आहेत. राज्यभरात या नोंदी शोधण्याचे काम सुरूच असून त्यानंतर ज्या नोंदी आढळून येतील त्याचे जतन केले जाणार आहे. मराठा आरक्षण प्रक्रियेत पुढील टप्प्यावर हे पुरावे तथा नोंदींची गरज लागणार आहे.

  • तपासलेल्या नोंदी १९,१९,३१५
  • १९४८-१९६७ काळातील नोंदी ७,९५८६५
  • १९४८ पूर्वीच्या नोंदी ११,२५४५०

मराठा कुणबी नोंदी सापडल्या ४०९०९जिल्ह्यात आजपर्यंत १९ लाख १९ हजार ३१५ नोंदीची तपासणी केली असून मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा ४० हजार ९०९ नाेंदी सापडल्या आहेत. नोंदी शोधण्याचे काम अजूनही सुरू असून प्रशासन सर्व विभागांकडून याबाबतची माहिती संकलित करत आहे. - नागशे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण