शेतकरी उद्योजक होण्यासाठी ४० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:02+5:302021-09-23T04:45:02+5:30

सातारा : ‘जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगा अंतर्गत उसापासून उपघटक बनविण्यात येणार आहेत. यासाठी शेतकरी उद्योजकांना ४० लाख ...

40 lakh fund to become a farmer entrepreneur | शेतकरी उद्योजक होण्यासाठी ४० लाखांचा निधी

शेतकरी उद्योजक होण्यासाठी ४० लाखांचा निधी

सातारा : ‘जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगा अंतर्गत उसापासून उपघटक बनविण्यात येणार आहेत. यासाठी शेतकरी उद्योजकांना ४० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकरी उद्योजक व्हावा यासाठीच ही मदत आहे,’ अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीची सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, समितीचे सदस्य प्रतीक कदम, शंकरराव खबाले, प्रकाश चव्हाण, सुरेखा जाधव, प्रियंका ठावरे आदी उपस्थित होते.

प्रथम कृषी समितीची सभा झाली. या वेळी मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

केंद्र शासनाच्या वतीने भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात उसापासून उपघटक बनविण्यात येणार आहेत. यासाठी शेतकरी उद्योजकांना ४० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये १० लाखांची सबसिडीही आहे. यातून शेतकरी उद्योजक व्हावा, अशीच अपेक्षा आहे, असे सांगण्यात आले.

बायोगॅस उभारणीसाठी १२ हजार रुपये अनुदान मिळते. पण, हे अनुदान तोकडे पडत आहे. काम करण्याबाबत अडचणी येतात. त्यामुळे २० हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसा ठराव कृषी समिती सभेत करण्यात आला आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन समितीची सभाही झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच काही ठरावही करण्यात आले.

....................................................

Web Title: 40 lakh fund to become a farmer entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.