गणेशोत्सवातील शांततेसाठी जावळीतून ४० जण तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:23+5:302021-09-11T04:41:23+5:30
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता रहावी, यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले आहे. या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे ...

गणेशोत्सवातील शांततेसाठी जावळीतून ४० जण तडीपार
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता रहावी, यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले आहे. या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुंडांसह एकूण ४० जणांना तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे.
मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल माने यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने तडीपार केलेल्या लोकांना १० दिवस जावळी तालुक्यात वास्तव्य करता येणार नाही.
तडीपार केलेल्या संशयितांना शुक्रवार दि. १० ते १९ सप्टेंबर या गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास व प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे जावळी तालुक्यात फिरताना दिसल्यानंतर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.