साताऱ्यात आढळले जीबीएसचे चार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 23:25 IST2025-01-30T23:25:25+5:302025-01-30T23:25:31+5:30

सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे चार रुग्ण आढळून आले आहेत.

4 gbs patients found in satara | साताऱ्यात आढळले जीबीएसचे चार रुग्ण

साताऱ्यात आढळले जीबीएसचे चार रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पुणे पाठोपाठ आता सातारा शहर तसेच कऱ्हाडमध्येही चार जीबीएसचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण तरुण मुले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर दोन रुग्ण साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर एक रुग्ण कऱ्हाड येथे उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे रुग्णावर देखरेख तसेच योग्य उपचार होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक रुग्णांवर उपचार करत आहे. आढळून आलेले जीबीएसचे हे रुग्ण पर जिल्ह्यातून आले असावेत असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. असेही वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

Web Title: 4 gbs patients found in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य