शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

भीतीमुळे ३८ कुटुंबांनी रात्र काढली जागून -इमारतीचा भराव खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 8:45 PM

सातारा : ‘जेवण अन् गप्पा-गोष्टी करून आमचे नुकतेच डोळे लागत होते, तोवर ‘धडाम’ असा आवाज झाला आणि आमची झोपचं उडाली.

ठळक मुद्देपिलर उघडे पडल्याने उडाला काळजाचा थरकाप : दोन दुचाकी ओढ्यात कोसळल्या

सातारा : ‘जेवण अन् गप्पा-गोष्टी करून आमचे नुकतेच डोळे लागत होते, तोवर ‘धडाम’ असा आवाज झाला आणि आमची झोपचं उडाली. मध्यरात्री अपार्टमेंटमध्ये राहणारे सर्वजण बाहेर आले आणि आवाजाच्या दिशेने पळू लागले. पार्किंगमध्ये आल्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. पार्किंगचा संपूर्ण भराव ओढ्यात कोसळला होता. तर इमारतीचे पिलर उघडे पडले होते. मात्र, सुदैवाने इमारतीला कसलाही धोका पोहोचला नाही.’ परंतु, खबरदारी म्हणून या इमारतीमधील ३८ कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली.पंताचा गोट येथे भटजी महाराज मठाजवळ दीपलक्ष्मी अपार्टमेंट आहे. २००७ साली या अपार्टमेंटचे बांधकाम पूर्ण झाले. तर २००८ रोजी कुटुंबीयांना याचा ताबा देण्यात आला. यामध्ये एकूण ३८ कुटुंबे सध्या वास्तव्य करीत आहेत. गुरुवारी रात्री येथील बहुतांश नागरिक नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर झोपी गेले. डोळा लागतो न लागतो तोच रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काहीतरी कोसळण्याचा आवाज झाला. आवाज ऐकून गोंधळ उडाल्याने सर्व कुटुंबे जागी झाली अन् जो-तो इमारतीमधून पळतच खाली येऊ लागले.

 

पार्किंगमधील दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. २०० फूट लांब व सुमारे २५ फूूट उंच संरक्षक भिंतीसह इमारतीचा संपूर्ण भराव इमारतीच्या खालून वाहणाºया नैसर्गिक ओढ्यात कोसळला होता. हे भयानक चित्र पाहून येथील रहिवाशांची झोपच उडाली. इमारतीला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने सर्वजण इमारतीपासून दूरवर गेले. तर काहीजणांनी शेजाºयांकडे आसरा घेतला.

या भरावात सेफ्टी टॅँक व पाण्याची टाकीही कोसळली. तर पार्किंगमधील दोन दुचाकीही मातीच्या ढिगाºयासह ओढ्यात कोसळल्या.या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह नगरसेवक तसेच पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रहिवाशांनी घाबरून न जाता धोकादायक ठिकाणी कोणीही येऊ नये, अशा सूचना करून संबंधित ठेकेदाराला पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात येईल, अशी ग्वाही गोरे यांनी दिली.