शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी रुपये, बॉक्स उघडताच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:01 IST

..अन् त्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केलं

सातारा : खरं वाटावं म्हणून घरातील काळूबाई देवीसमोर भाेंदू मांत्रिकाने सहा बंदिस्त बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये ३० कोटी रुपये आहेत. पण, हे बाॅक्स २१ दिवसांनंतर उघडा, असे मांत्रिकाने सांगितले. आपल्याला एवढे पैसे मिळाले म्हणून सर्वजण खूश होते. जेव्हा २१व्या दिवशी हे बाॅक्स उघडले तेव्हा त्यामध्ये चक्क वर्तमान पत्रांची रद्दी निघाली. अशा प्रकारे संबंधित भोंदूबाबा आणि त्याच्या पिलावळीने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.कांता वामन बनसोडे (वय ६०, रा. देवापूर, ता. माण) हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिकासह दोघांनी दैवीशक्ती व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले. मात्र, त्यासाठी पूजेचे साहित्य आणावे लागेल असे सांगितले. या साहित्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये बनसोडे यांनी फोन पेद्वारे संबंधितांना पाठविले. एवढेच नव्हे तर बनसोडे यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही पूजेसाठी कोणी १२ लाख, तर कोणी ८ लाख भोंदू मांत्रिकाकडे दिले.ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडून मांत्रिकाने घरातील देवीसमोर बनसोडे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त सहा बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये तब्बल ३० कोटी रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पण, हे बाॅक्स २१ दिवस पूर्ण झाल्यानंतरच उघडायचे, असे त्याने त्यांच्याकडून वदवून घेतले. बंदिस्त बाॅक्स बनसोडे व इतर लोकांनी घरी नेल्यानंतर सर्वजण २१ दिवस कधी पूर्ण होताहेत, याची वाट पाहात होते. अखेर तो दिवस उजाडणार तोच मांत्रिकाने फोन करून सांगितले, बाॅक्स उघडू नका. तांत्रिक अडचण आली आहे.

..अन् त्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केलंमांत्रिकाने दिलेले सहा बाॅक्स उघडण्यापूर्वी बनसोडे यांच्यासह अन्य तक्रारदारही एकत्र आले. या सर्वांनी ठरवलं. मांत्रिकाचे ऐकायचे नाही. आपण बाॅक्स उघडायचे. याचे व्हिडीओ शूटिंग करायचं त्यांनी ठरवलं. हळूहळू सहा बाॅक्स त्यांनी उघडण्यास घेतले. सर्व बाॅक्स उघडून झाल्यानंतर त्यामध्ये तीस कोटी नव्हे तर चक्क वर्तमानपत्रांची रद्दी निघाली.

म्हणे, पोलिसांनी दखल घेतली नाहीबनसोडे यांनी त्यांची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात केली. परंतु, त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. संबंधित मांत्रिकावर वेळीच कारवाई न झाल्यास त्याच्या गळाला आणखी कितीतरी लोक लागतील, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस