शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वत:च्या शेतासाठी सोडली ३५ हजार पगाराची नोकरी

By admin | Updated: August 3, 2015 21:47 IST

देऊरच्या कदम यांनी पिकवल्या चायनीज भाज्या

प्रत्येक जण आयुष्यात काही तरी बनण्याची संधी शोधत आहे. खरंतर ही संधी कुठेही शोधण्याची गरज नाही; कारण ती संधी प्रत्येकामध्ये आहे, हा विश्वास जोपासत प्रत्येक माणसाने कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न केल्यास यश मिळतेच. हाच विश्वास सार्थ ठरवत शेतीला आपली जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून स्वीकारून शासकीय नोकरीचा त्याग करत गावच्या मातीत नोकरीतून आलेल्या अनुभव, ज्ञानाचा उपयोग करण्याचे काम देऊर, ता. कोरेगाव येथील कृषी पदवीधारक युवा शेतकरी देवेंद्र कदम करत आहेत. त्यांनी चायनीज भाज्यांचे उत्पादन घेतले आहे.देऊर येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले देवेंद्र कदम यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देऊर येथील मुधाई विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फलटण येथील मुधोजी कृषी विद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. कृषी पदविका पुणे येथील कॉलेज आॅफ अ‍ॅग्रिकल्चर या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर खरंतर त्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असतानाही घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षणाला रामराम करत नोकरीचा मार्ग स्वीकारला. राहुरी कृषी विद्यापीठातील प्रा. संभाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील शबरी कृषी प्रतिष्ठानमध्ये दीड वर्षे ५० एकर रायबोरीच्या बागेचे व्यवस्थापन केले.दरम्यान, १९९५ मध्ये भारतीय अनुसंज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राची निर्मिती झाली. यावेळी सोलापूर कृषीविज्ञान केंद्रात प्रोग्राम सहायक या पदावर १९९५ ते २०११ या काळात नोकरी केली. परंतु, नोकरी करतानाच मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या भागातील शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने त्यांनी नोकरीचा त्याग करून २०११ मध्ये देऊर गावात सातारा-लोणंद राज्यमार्गावर स्वत:ची भाजीपाला नर्सरी उभी केली. परंतु २०११ ते आजपर्यंत दुष्काळात नर्सरीचा उद्देश सफल झाला नाही. कोणत्याही क्षेत्राला मर्यादित न ठेवता नवनवीन संकल्पना राबवत देवेंद्र कदम यांनी नर्सरीच्या जोडीला लॅण्डस्केप गार्डनिंंगच्या कामात लक्ष घातले.लॅण्डस्केप गार्डन ही संकल्पना पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरात रुजली असताना ही संकल्पना आता सातारा जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचली आहे. देवेंद्र कदम हे लोणंद, फलटण, सातारा, खंडाळा येथील औद्योगिक वसाहतीत लॅण्डस्केप गार्डनचे काम करत आहेत. कदम यांनी शेतात चायनिज भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन घेताना त्यांनी शेतात ठिबक सिंचनबरोबरच मल्चिंग पेपरचा वापर केल्याने त्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. ‘शेतीमध्ये अनेक रोजगाराच्या संधी आहेत, फक्त प्रत्येकाला त्या शोधता आल्या पाहिजेत,’ असे कदम आवर्जून सांगतात.-- संजय कदम