शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विंगमधील रियटर कंपनीतील ३४८ कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या 

By दीपक देशमुख | Updated: September 6, 2023 17:35 IST

तडकाफडकी बडतर्फ केलेल्या बारा जणांना कामावर घेण्याची मागणी

सातारा : शिरवळ, ता खंडाळा येथील रियटर कंपनीतील अचानक बडतर्फ केलेल्या बारा कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी ३४८ कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कामगार आणि कुटुंबियांनी जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. रिएटर कंपनी प्रशासन व कामगार यांच्यामध्ये कामगार युनियनच्या मुद्द्यावरून गेले ४५ दिवस वाद सुरू आहे. कंपनीच्या कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्हा प्रशासन तसेच सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याकडे बाजू मांडली. परंतु, अद्याप या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रिएटर कंपनीच्या ३४८ कामगारांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून भर उन्हात कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. आंदोलकांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युनियनच्या दोन पदाधिकाऱ्यांसह एकूण बारा कामगारांना तडकाफडकी कंपनीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई रद्द करावी. बारा कामगारांवर खोटे आरोप लावून केलेले निलंबन व चौकशी रद्द व्हावी. दहा कामगारांना खोटे आरोप पत्र देऊन सुरू करण्यात आलेली चौकशी थांबवावी. २० कामगारांची ट्रेनिंग व डेप्युटेशनच्या नावाखाली चंदीगढ व कोईमतूर येथे बदली करण्यात आली आहे, ती रद्द करावी, कामगारांना कामाच्या ठिकाणी दिली जाणारी अन्यायकारक वागणूक थांबवावी, अशा मागण्या कामगारांनी केल्या आहेत. कंपनी प्रशासनाने लवचिक पवित्रा घ्यावा आणि कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी योगेश खामकर व अध्यक्ष किरण गोळे यांनी केली आहे. तोडगा निघाला नाही तर तीव्र उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन