शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वसुली करून आणलेले पैसे परस्पर हडपले, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ३४ लाखांची अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:31 IST

सातारा : कर्जदारांकडून वसुली करून आणलेले ३४ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी शहरातील एका फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांवर सातारा ...

सातारा : कर्जदारांकडून वसुली करून आणलेले ३४ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी शहरातील एका फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतीश अशोक मदने (रा. वारुगड, ता. माण, जि. सातारा), प्रणल चांगदेव सूर्यागण (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), अक्षय बाळासो जराड (रा. पेरुचा मळा, जराडवाडी, ता. बारामती, जि. पुणे) ,सुरज भारत वाघमारे (रा. तळबीड, ता. कऱ्हाड)अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये भारत फायनान्स इक्लुजन लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये वरील चाैघे वसुली अधिकारी म्हणून काम करत होते. या चाैघांनी कर्जदाराच्या नावाने कर्ज वाटप केले व कर्जाची ३ लाख ९२ हजारांची रक्कम कंपनीच्या सदस्याच्या नावे घेतले. कर्जदारांना वाटप न करता कंपनीची त्यांनी फसवणूक केली.तसेच १३० कर्जदारांचे मुदतीपूर्वी भरणा केलेले २० लाख ८९ हजार कंपनीमध्ये न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. त्याचबरोबर ३६ कर्जदारांचे प्रत्येक आठवड्याला वसुली केलेली ५ लाख ७२ हजार ६४४ रुपयांची रोकड स्वत:साठी वापरली. अशाप्रकारे एकूण २०० कर्जदारांच्या ३४ लाख १ हजार ३५३ रुपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक करून त्यांनी अफरातफर केली. फायनान्स कंपनीचे तुषार भोसले (वय ३०, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमाेडे हे अधिक तपास करीत आहेत.तक्रार अर्जात निष्पन्न...फायनान्स कंपनीने चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात २०२१ मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशी झाल्यानंतर अफरातफरीमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, कंपनीच्या कर्मचाऱ्याला बोलावून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी