शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा लोकसभेसाठी २४ जणांचे ३३ अर्ज, आज छाननी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 13:28 IST

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १६ अर्ज दाखल

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. १२ ते १९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १६, तर शेवट्या दिवसा अखेर एकूण २४ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्जाची छाननी दि. २० रोजी होणार आहे, तर अर्ज मागे घेण्याची मुदत दि. २२ एप्रिलपर्यंत आहे.सातारा येथील जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात शुक्रवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले भाजप, वैशाली शशिकांत शिंदे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ), आनंदा रमेश थोरवडे, कऱ्हाड यांनी बहुजन समाज पार्टी, तुषार मोतलिंग, कळंबे यांनी बहुजन मुक्ती पार्टी, प्रशांत रघुनाथ कदम, रा. वडगाव (उंब्रज), ता. कराड (वंचित बहुजन आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज भरले तर अपक्ष म्हणून सीमा पोतदार पुसेसावळी, प्रतिभा सुनील शेलार, सातारा, विठ्ठल सखाराम कदम, रा. जोर, पो. वयगाव, ता. वाई, विश्वजित अशोक पाटील, रा. उंडाळे, ता. कराड, मारुती धोंडीराम जानकर, सातारा, अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले सातारा, सचिन सुभाष महाजन, रा. बुध, ता. खटाव, सदाशिव साहेबराव बागल, रा. गोवे, ता. सातारा, गणेश शिवाजी घाडगे, रा. शिबेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.तसेच यापूर्वीही शशिकांत शिंदे, ( शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ), उदयनराजे भोसले भाजप, दिलीप बर्गे भारतीय जवान किसान पार्टी, दादासाहेब वसंतराव ओव्हाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सयाजी वाघमारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पक्ष, आनंदा रमेश थोरवडे बहुजन समाज पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून राहुल चव्हाण, सागर भिसे, निवृत्ती शिंदे, चंद्रकांत कांबळे, संजय गाडे, सुरेशराव कोरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. छाननी व अर्ज माघारीनंतर लढतीचे लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४