शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कोयनेतून ३२ हजार क्यूसेकने विसर्ग, धरणाचे दरवाजे साडे तीन फुटापर्यंत उचलले

By नितीन काळेल | Updated: September 14, 2022 15:19 IST

पूर्व दुष्काळी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम  भागात जोरदार पाऊस होत असून आज, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेत १०६, नवजा येथे १३७ तर महाबळेश्वरला ११६ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सुमारे १०४ टीएमसी साठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे साडे तीन फुटापर्यंत उचलून  विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून एकूण ३२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. पूर्व दुष्काळी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. तर पश्चिम भागातील कास, नवजा, बामणोली, तापोळा, कोयना, महाबळेश्वर भागात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशा प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून दोन दिवसांपूर्वी विसर्ग सुरु करण्यात आलेला. त्यानंतर सोमवारी रात्री दरवाजे दीड फुटांनी उचलून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदाच दरवाजे उघडण्यात आले. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून बुधवारी सकाळी ११ पासून सहा दरवाजे साडे तीन फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. पायथा वीजगृह १०५० आणि दरवाजातून ३१,५३१ क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे कोयनेतून एकूण ३२,५८१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जूनपासून आतार्पंत कोयनेला ४,२४७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर नवजा येथे ५,१७४ आणि महाबळेश्वरला ५,४९२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण या तालुक्यातही पावसाची हजेरी आहे.

उरमोडीतून १९३४ क्यूसेक विसर्ग...उरमोडी धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. त्यातच धरणात ९.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण भरल्यातच जमा आहे. या धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास विद्युत गृहातून ५०० आणि सांडवा १४३४ असा एकूण १९३४ क्यूसेक विसर्ग सुरु होता.

वीरमधून १६ हजार क्यूसेक विसर्ग...पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. उजवा कालवा विद्युतगृह ११००, डावा कालवा विद्युतगृह ९०० क्यूसेक विसर्ग होत आहे. तर धरणाच्या सांडव्यातून मंगळवारी रात्रीपासून १३,९११ क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे वीर धरणातून एकूण १५,९११ क्यूसेक विसर्ग नीरा नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी