शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सातारा जिल्ह्यात ३१४ हेक्टरला अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे 

By दीपक शिंदे | Updated: March 31, 2023 14:11 IST

अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल समोर आला

सातारा : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यानाच फटका बसला आहे. तर या पावसामुळे १,४९७ शेतकरी बाधित झाले असून त्यांनी लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, माण, खटाव आणि पाटण तालुक्यात हा पाऊस पडला. यामध्ये शेती पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. नुकतेच अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात हे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर आहे. तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसला आहे. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झालेले आहे. तर माण तालुक्यात बागायत पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर असून ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...अवकाळी पावसाचा फक्त तीन तालुक्यातीलच शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संप मिटल्यानंतर पंचनामे सुरू...जिल्ह्यातील शासकीय वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी जुनी पेन्शन योजना मागणीसाठी संपात सहभागी झाले होते. यामध्ये कृषिसेवक, ग्रामसेवक आणि तलाठी यांचाही समावेश होता. हेच कर्मचारी पीक पंचनामे करतात. संपकाळातच अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे केले नव्हते. पण, काही दिवसांनी संप मागे घेण्यात आला. त्यानंतरच अवकाळीतील नुकसानीच्या पंचनाम्याला वेग आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी