शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 07:30 IST

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे. 

-अमर शैलामुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील ५२९ गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करेल. 

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे. 

तो लवकरच अंतिम केला जाईल. या २३५ गावांमध्ये रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्र्रॅक, फ्युनिक्यूलर रेल्वे यांच्या विकासासह टुरिस्ट पॅराडाइज, पर्यटन आणि निसर्गसंपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे. त्यातून तेथे पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

यापूर्वी नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४४ चौ. किमी आहे.  

हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यातून या भागाचा नियोजनबद्धरीतीने विकास होण्यास मदत मिळेल, असे एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.या २३५ गावांचे एकूण क्षेत्र १,१५,३०० हेक्टर आहे. आता नव्याने समाविष्ट केल्या जाणाऱ्या २९४ गावांचे क्षेत्रफळ ९४,४०४ हेक्टर एवढे आहे. या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

समावेश होणारी प्रमुख गावे

सातारा : यवतेश्वर, पाटेघर, रेवळी, परळी, नुणे, रोहोत, सरखाल, भांबावळी, चिंचणी, दरे बुद्रुक, धावडशी, कळंबे, कामठी तर्फे सातारा, कान्हेर, करंजे तर्फे परळी, आंबावडे बु. आगुडेवाडी. 

पाटण : झाकडे, विहे, करंजवडे, येरफळे, तोरणे, साळवे, सांबूर, शिंदेवाडी, शिरशिंगे, तळीये, तेलेवाडी, नवजा, नाटोशी, निवडे, रोहिने, मारूळ हवेली, मुरूड, म्हावशी, मणेरी, गोकुळ तर्फे हेळवाक, जरेवाडी, काळगाव, डिचोळी, दिवाशी खुर्द, बाणपुरी, चाळकेवाडी. 

जावळी : मालदेव, मेट इंदवली, मोहाट, पाली तर्फे तांब, ताकवली, तांबी, वासोटा, आडोशी, अंबेघर तर्फे मेढा, भणंग, गवडी, जुंगटी, खिरखंडी, कुसापुर, कुसवडे, माडोशी.

टॅग्स :tourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार