शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

माजगावात बिबट्याच्या हल्यात २४५ देशी कोंबड्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 3:10 PM

forest department Satara News : पाळीव देशी कोबंड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासात फडशा पाडल्याची घटना विभागातील माजगांव ता. पाटण येथे घडली. विक्रम महिपाल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करत संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देमाजगावात बिबट्याच्या हल्यात २४५ देशी कोंबड्या ठारमहिपाल यांना मदत मिळवून देण्याचे वनविभागाचे आश्वासन

चाफळ : पाळीव देशी कोबंड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासात फडशा पाडल्याची घटना विभागातील माजगांव ता. पाटण येथे घडली. विक्रम महिपाल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागानेबिबट्याचा बंदोबस्त करत संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.चाफळसह परिसरातील गावागावात बिबट्याचा वावर नित्याचाच ठरला आहे. वारंवार मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांना बिबट्या भक्ष्य करु लागला आहे. यात मात्र शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच अडचणी सापडलेला बळीराजा कधी अतिव्रष्टीला तर कधी पशुधन धोक्यात आल्याने मेटाकुटीला आला आहे. माजगांव, चाफळसह परिसरात गत काही महिन्यापासून बिबट्या सतत शेतकऱ्यांच्या नजरेस पडू लागला आहे. गत काही दिवसांपूर्वी चाफळ येथील लक्ष्मीनगरमध्ये थेट मानवी वस्तीत प्रवेश करत जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळी ठार मारली होती.या घटनेनंतर बिबट्याने माजगांव येथील राममळा नावाच्या शिवारातील विक्रम महिपाल यांच्या देशी कोंबड्यांच्या शेडवर आपल्या साथीदारा सोबत हल्ला चढवत शेडमधील २४५ कोंबड्यांचा चुराडा केला. तर २२ कोंबड्या जखमी अवस्थेत इतरस्त्र आढळून आल्या. यात महिपाल यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे सलून व्यवसाय बंद असल्याने महिपाल यांनी कर्जे काढून आपल्या राममळा शिवारातील शेतामध्ये शेड उभारुन देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. व्यवसाय थाटला खरा पन बिबट्याने तो थोड्याच दिवसात मोडून काढल्याने महिपाल यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा करुन महिपाल यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महिपाल यांच्यासह माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.महिपाल यांना मदत मिळवून देण्याचे वनविभागाचे आश्वासनविक्रम महिपाल यांनी नातेवाईक व मित्रमंडळीकडून पैसे उसने घेवून शेतात शेड उभारुन देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. २६७ कोंबड्या या शेडमध्ये होत्या. यातील २४५ कोंबड्या या हल्यात मारल्या गेल्यात. या घटनेची माहिती वनविभागास माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील व महिपाल यांनी दिल्यानंतर वनरक्षक विलास वाघमारे यांनी सदर घटनेचा पंचनामा करत महिपाल यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर