हिंगणगावच्या कुक्कुटपालन केंद्रात २२ कोराेनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:37+5:302021-06-27T04:25:37+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील बहुतांशी गावे कोरोनामुक्त होत असताना हिंगणगाव (सुळवस्ती) येथील कुक्कुटपालन केंद्रात एकाच दिवशी बावीसजण कोरोनाबाधित आढळले. ...

हिंगणगावच्या कुक्कुटपालन केंद्रात २२ कोराेनाबाधित
आदर्की : फलटण तालुक्यातील बहुतांशी गावे कोरोनामुक्त होत असताना हिंगणगाव (सुळवस्ती) येथील कुक्कुटपालन केंद्रात एकाच दिवशी बावीसजण कोरोनाबाधित आढळले. पोल्ट्री फार्म प्रतिबंधित क्षेत्र होत आहे. हे बावीस रुग्ण परराज्य व आदर्की परिसरातील आहेत.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील हिंगणगाव, सासवड, बिबी, घाडगेवाडी, कापशी, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक गावांमध्ये कोरोना वाढत आहे. दोन-तीन अंकी रूग्ण होते पण कापशी, बिबी, घाडगेवाडी, आळजापूर, हिंगणगाव, टाकोबाईचीवाडी, सासवड, मुळीकवाडी येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून विलगीकरण कक्ष सुरू केले. यामुळे हिंगणगाव, बिबी, कापशी, आळजापूर, घाडगेवाडी, मुळीकवाडी, सासवड, आदर्की कोरोनामुक्त गावे झाली. मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड येथे एक-दोन बाधित रूग्ण सापडले. मात्र, आदर्की खुर्द येथे गेल्या आठवड्यात सातजण कोरोनाबाधित सापडले होते. गावात बिबी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोरोना चाचणी घेतली. त्यावेळी दोन रूग्ण बाधित सापडले आहेत.
हिंगणगाव येथील विलगीकरण कक्ष कोरोनामुक्त झाल्यानंतर गावात दोन-तीन रुग्ण कोरोनाबाधित झाल्याने त्या रूग्णांना विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यानंतर हिंगणगाव ग्रामपंचायत हद्दीत सुळवस्ती येथे एक कुक्कुटपालन केंद्र आहे. कोराेना चाचणी केल्यानंतर येथील २२ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. या पोल्ट्री फार्मवर ८८ कामगार काम करत आहेत. हे कामगार परराज्यातील असल्याने त्यांना भाषेची अडचण येणार असल्याने बाधितांना पोल्ट्री फार्मवर स्वतंत्र खोलीमध्ये ठेवल्याचे समजते. पोल्ट्री फार्मपासून तीनशे मीटर अंतरावर एका मंदिरात एका मालिकेचे चित्रीकरण सुरू होते.