शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात मतदान वाढीसाठी दोन हजार कर्मचारी एक लाख कुटुंबाच्या घरात..

By नितीन काळेल | Updated: May 4, 2024 18:33 IST

जिल्हा परिषदेकडून मतदारांत जागृती : गृहभेट कार्यक्रमात मतदारराजाला आवाहन 

सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून शनिवारी मतदार गृहभेट कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या दाेन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक लाख कुटुबांना भेट दिली. यामाध्यमातून निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली.सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांनी ४ मे रोजी मतदार गृहभेट दिवस राबविला. यासाठी जिल्हा परिषदेकडील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वांनी मतदान जनजागृतीसाठी एक लाख कुटुंबाला भेट दिली. या भेटीत संबंधितांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच मतदारांना मतदानादिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना सूचनाही केली.

आैद्योगिक वसाहतीत १०० टक्के मतदानाचा नारा..मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजागृतीसाठी साताऱ्यातील आैद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्व सांगून सर्वांनी आपले कुटुंब आणि नातेवाईकांसह १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच सातारा स्वीप कक्षामार्फत कामगारांना मतदान जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या अर्चना वाघमळे, महिला व बालकल्याणच्या रोहिणी ढवळे, सातारचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नीलेश घुले यांनी उपस्थित कामगारांना मतदानाची शपथ दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४zpजिल्हा परिषद