क्लासमधील मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षांची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल
By दत्ता यादव | Updated: December 14, 2022 22:08 IST2022-12-14T22:07:35+5:302022-12-14T22:08:17+5:30
जामिनावर सुटल्यानंतरही केला बलात्कार

क्लासमधील मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षांची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: शिक्षणासाठी क्लासमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी खासगी क्लास चालक समीर बाबासाहेब मुजावर (वय ३८, रा. करंजे नाका, सातारा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी (पोक्सो) २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना २८ एप्रिल २०१८मध्ये घडली होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, सातारा शहरामध्ये एक खासगी क्लास होता. या क्लासमध्ये अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी येत होती. यावेळी खासगी क्लासमधील शिक्षक समीर मुजावर याने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला. अश्लील व्हिडीओ तिच्या मोबाइलवर पाठवले तसेच मुलीचेही अश्लील व्हिडीओ तयार केले. तीअल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने मुलीचे अपहरण केले. यानंतर मुलीच्या आर्इने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली. परंतु काही दिवसानंतर तोजामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा मुलीला फूस लावून विवाह करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर बलात्कार केला. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात समीर मुजावर याच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते.
पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले १४ साक्षीदार आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने समीर मुजावर याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मंजुषा तळवलकर यांनी काम पाहिले. प्रॉसिक्यूशन स्कॉडचे सहायक फाैजदार अविनाश पवार, शमशुद्दीन शेख, अमित भरते यांनी त्यांना सहकार्य केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"